इतके यश तुला रगड़ माझ्या मना बन दगड....

सोमवारी दत्त जयंती च्या मुहूर्तावर श्री साई कृपेने मी क्लासेस ला सुरवात केली.पहिल्या दिवशी ५ विद्यार्थी , दुसऱ्या दिवशी ६ आणि आज हि संख्या १० वर जाऊन पोहचली.आई वडिलांना १०० ची अपेक्षा होती,मला अजूनही आहे.अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि कॉलेज ने अजूनही राजीनामा मंजूर न केल्यामुळे कॉलेज करून क्लासेस कर असा दबाव वाढायला लागला.आई, वडील, काका, अनुजाची आई सगळ्यांनी आग्रह धरला.पण मी माझा निर्णय बदलला नाही.२५ हजाराची नोकरी सोडणारा म्हणून अजूनही खूप जन वेड्यात काढतात मला.कधी कधी खूप प्रेशर वाढत.पण आता मागे हटायचं नाही अस ठरवलंय मी. लोकांना वाटत कि २५ हजारापेक्षा जास्त काय असेल या ट्युशन किवा क्लासेस मध्ये.प्राध्यापकी सोडून हा १० विचा शिक्षक का झाला? पण मी स्वताला शिक्षक समजत नाही, मी स्वताला एका कंपनीचा MANAGING DIRECTOR समजतो.क्लासेस एखाद्या प्रोफेशनल कंपनी सारखे चालवता येतात हेच इथल्या लोकांना माहित नाही.
काल पेपर मध्ये चाटे कोचिंग क्लासेस ची जाहिरात पहिली.त्यांना लेक्चरर, कौन्सिलर आणि डी टी पी ऑपरेटर हवे होते.मी विचार केला माझ्या क्लासेस मध्ये कोण आहेत या सर्व पोस्ट वर.मुलांना लेक्चर्स मी देतो,त्यांना कौन्सलिन्ग पण मी करतो आणि नोट्स लिहून झाल्यावर त्याच डी टी पी पण मीच करतो.कधी कधी वाटत हे सगळ खूप मोठ होणार आहे.कधी कधी वाटत हे सगळ काही उपयोगाच नाही.एक गोष्ट मात्र समजते आहे,वाटत तितक सोप नाही हे सगळ.प्रेशर वाढल म्हणून मित्रांपाशी मोकळ व्हावस वाटलं.
--

Sagar Sarvottam Kulkarni
Director, 'KULKARNI CLASSES',
Mobile:9766987759 / 8087899069

SHIRDI (22/12/2010,11.40 pm)