मी फ़क्त श्रोता...

उसवलेल्या अन्तरंगाला शिवन्याचा यत्न तू केला
मी मात्र तुज्या धाग्यांच्या रंगावरून रुसलो
शिवाताना झालेल्या वेदानानी त्रासलो;
बाहुपाशात तुला घेण्या एइवजी;
स्वतः च्याच सुखा-दुखाना कवट'-आलून' बसलो.

खर सांगू...
चुक तुझीच होती.
तू घातलेली फुंकर आठवते?
तिने मी सुखावलो,हरखलो...खर तर माजलो.
तो माज..
उन्मत्त चान्दंयांचा; अमावस्येच्या तिमिरातुन चंद्राच्या कृपेने बाहेर आलेल्या.
ते सुख...
प्रशांत समुद्राचे; भरतीच्या वेदनेतून चंद्राच्या अस्तामुले' सुटलेल.
तो हरखलेला मी...
निर्मल सरितेसारखा;चंद्राच्या केवल असण्याने सुंदर झालेली.

मी चांदनी की समुद्र की सरिता?
नाही कल्णार मला!

तुजा उदय, तुजा अस्त, तुझे केवळ असणे;
याच "माझ्या" व्याख्या!
तुज्या क्षमेचा मी याचक नाही,
तुझ्या संत वचनांचा मी वचकहि नाही;

मी फ़क्त श्रोता...
तुझ्या गल्यातिल सप्त सुरांचा;
श्रवण ज्याचे माझे अंत-रंग...पुन्हा उसवते.

-प्रवीण लुलेकर.