Borkaranchi Kaifiyat ki Samadhan?

तु तेव्हा आकाशाएवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकान्तिकेचा
मनमुराद रस चाखुन
नि:सन्ग अवधुतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चान्दण्यात
असा हिन्डत राहीलोच नसतो

तु केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो

B.B Borkar