प्रेम करावे असे,परन्तु…

हिरवे हिरवे माळ मोकले
ढवल्या ढवल्या त्यावर गायी;
प्रेम करावे आशा ठिकाणी
विसरुनी भीती विसरुनी घाई;

प्रेम करावे रक्ता मधले
प्रेम करावे शुद्ध,पशुसम;
शतजन्मान्च्य अवसनाने
रक्तमधलि गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होवुनिया तृण;
प्रेम करावे असे, परन्तु
…प्रेम करावे हे कल्याविन.

बेलगाँव
15 July 1952
विंदा करंदीकर