माझ्या मना बन दगड

माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटल आहे!
अन्नाशिवाय , कपडयाशिवाय,
द्यानाशिवय,मनाशिवय.
कुडकुडणारे हे जिव पाहू नको!
डोळे शिव!नको पाहू
जिणे भकास;छातिमधे आडेल श्वास.
विसर्यन्ना दाब काढ ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटल आहे !
ऐकू नको हा आक्रोश,
तुज्या गळ्याला पडेल शोष.
कनावारती हात धर,
त्यातुनही येतील स्वर.
म्हणुन ओत शिसे;
संभाल,संभाल,लागेल पिसे!
रडणार्या ,रडशील किती?
झुरनार्या,झुरशील किती?
पिचानार्या पिचशील किती ?
ऐकू नको असले टाहो;
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटल आहे!
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत कलोखात;
हसतात विचकुन काले दात ;
आणी म्हणतात , ” कर हिम्मत;
आत्मा विक,उचल किम्मत!
माणुस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला स्मरा नित्य.”
भिशील ऐकून असले ed ;
बन दगड,नको खेद!

बन दगड आज पासून
काय अडेल तुज्या वाचून;
गाला वरचे खारे पाणी
पिउन काय जगेल onii ?
काय तुझे हे निश्वास
मरणा-र्याना देतील श्वास?
आणिक दु:ख छाती फोडे
देईल त्यांना सुख थोड़े?
आहे दुख तेच फार ;
माझ्या मना कर विचार ;
कर विचार हास रगड़ ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटल आहे!
अटल घान सारी ;
अटल आहे ही शिसारी,
एक वेळ अशी येईल
घनिचेच ख़त होईल
अन्यायाची सारी शिते,
उठतिल पुन्हा;होतील भूते
या सोन्याचे बनतील सुळ!
सूली जाईल सारे कुळ.
ऐका टापा ऐका आवाज!
लाल धुल उड़ते आज;
याच्यामागुन येईल स्वार;
या दगडाला लावील धार!
इतके यश तुला रगड़;
माझ्या मना बन दगड.

-VinDa Karandikar
Ratanagri 4 Nov 1949