साधा माणुस

सर्वसाक्षी दयामय चैतन्य प्रभो ,

आपण आहात की नाही याची खात्री करून घेण्यात माझा निम्मा जन्म गेला.पुढे श्रद्धेने आपण असल्याचे मी मानले.संतांच्या संगीन, कीर्तन -पुराणन मधील वर्णन प्रमाने आपल्याला साकार करून आपली पूजा बांधू लागलो. आपण सर्व काही आहात , आपल्यावाचुन काही असूच शकत नाही , अशी आता खात्री पटली . पण अजुनही ती श्रद्धाच आहे ; अनुभूति नाही .ती श्रद्धा साधनेने द्यानात परिणित होउन माझ्यातला ‘मी’ मला माहिती व्ह्वावाही उत्कंठा आहे. मग ती पुरी होण्यासाठी मला कितीही जन्म घ्यावे लागोत.

आजवरचे जीवन उपभोगूनही उपभोगांच्या वासनेच्या जलवा दीर्घ सवयीनेआद्याप या चंचल मनाला चिकटून आहेत.त्याना काढून टाकन्यासाठी आजही आपण मला इच्छादेत आहात ही आपली कृपा आणी त्याकरता आजही शरीर कार्यक्षम राखालेत हे माझे भाग्य. स्वत:चे दोष काबुल करून ते निरग्रहाने दूर करण्याचे धैर्य मला दया. दुबळी बडबड करून नसत्या द्यानाचा दिमाख दाखवन्याच्या दुर्बुद्धि पासून मला दूर ठेवा. गतकालच्या भेटलेल्या भूतानि मला झपाटू नये. पण इतरांच्या उपकाराची, प्रेमाची आणी मदतीची सदैव जाण राहिल एवढी कृतद्न्यता मला अवश्य द्या. भेटेल त्याला स्वत:ची दुखः ऐकवत राहून, इतरांच्या दयेची भिक मगनारा भिकारी मला होऊ देऊ नका. आपल्या ध्यानासथी मला एकांताची सवय लागुद्या;पण एकल-कोंडे वाटू अगर राहू देऊ नका. आपण दयलुपणे दिलेली बुद्धि, शक्ति व संधी मी कळतअसुनही देव, देश, धर्मं यासाठी हवी तेवढी उपयोजली नाही याबद्दल मला क्षमा करा. व्यवहारीजगातील अपयाशांचा आणी रुणाचा डोंगर डोक्यावर ठेवून मला आपल्या पायी येऊ देऊ नका.अखेर पर्यंत शिवाकार्यार्थ हे शरीर व बुद्धि समर्थ ठेवा आणी सज्जनांच्या सहनुभुतित,संमित्रांच्या प्रेमात मला आपल्या कृपेचा साक्षात्कार होऊ द्या, हे आपल्या चैतन्यमय चरणीविनम्र प्रार्थना.

- भालजी पेंढारकर (Bhalaji Pendharkar)
Kolhapur
Age-95 years (when he wrote this,he is no more)
Prologue of his auto-biography,
SADHA MANUS ( साधा माणुस).