संध्याकाळी माय सजायची

संध्याकाळी माय सजायची
अवनिवर अप्सरा उतरायची,
घमघमनारा गजरा
सावला वर्ण लाजरा
माय माझी भरजरी साडी नेसयची.

मला मग माय खेलायाला धडायाची,
परत आलो की उदासा भासयाची ;
पसरलेल नेत्रांजन,
चेहरा अश्रुन्च आंगन
साडीसारखिच मायाही विस्कटलेली असायची.

मला पाहून मात्र ती सवारयाची
...म्हणजे...तसा प्रयत्न करायची .
जुन्या साडीचा फटका पदर ,
प्रेमाने भरवलेलि चटनी भाकर ,
मला झोपी घालून
माय अश्रुनाचा बांध फोडायची.


पण तिच्या मनाच्या सौन्दर्या प्रमाणे
तिच्या देहाचे सौंदर्य शास्वत नव्हत ;
आणी त्या अभावी शरिराच दुकान चालत नव्हत .
आता धनाढ्यआंची गाड़ी वेगळ्याच बोळी- त वलायाची.
तरीही... संध्याकाळी माय सजायाची.

धनाढ्य गेले धनही गेल ,
आता आमच्याकडे घर नव्हत .
काल पर्यंत जी माय राणी होती
तिच्याकड़े आज अन्न नव्हत छप्पर नव्हत.
फाटक्या झोपडी-च्या कोपर्यात माय फुटका आरसा ठेवायची ;
धुणं भांडी करून आल्यावर
संध्याकाळी माय सजायाची.

अंतिम घटिकेला माय मला जवळ बोलवायची ;
मला दिले अलंकार ज्यानी ती सजायाची
अलंकार विकले ,
धनांचे डोंगर उभे केले;
आठवतात अलंकार...ज्यानी माय सजायाची.
आठवते संध्याकाल...जेव्हा माय सजायाची.

-प्रवीण लुलेकर