कृपा

मी न मानीली अनंतातल्या दगडा वरची
ती दादागीरी;
मी न सहीला कड़े-लोट
तो अंधारातील;
मी न याचिले मोक्शाचे
ते शुष्क विलोभन.
या सगल्यांवर थुन्कुन गेलो
लाल पींक मी.
अणि उमगले आज पाहता वलून मागे
त्या पीन्केवर तुज्या क्रुपेचे इंद्रधनू नव !

-विंदा करंदीकर (मृदगंध)